Published Dec 26, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - istock
सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात याला विशेष महत्त्व आहे
सोमवती अमावस्येला भगवान शिव, माता पार्वती, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते.
2024 ची शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या आहे. जी 30 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी पूजा करण्याची पद्धत कोणती ते जाणून घ्या
सोमवती अमावस्येला पिंपळाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. असे मानले जाते की, पिंपळाच्या झाडामध्ये प्रत्येक देवी देवतांचा वास असतो.
अशा स्थितीत साधकाने सोमवती अमावस्येला सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर झाडाखाली दिवा लावावा
यानंतर गंगाजल अर्पण करा आणि झाडाची 108 वेळा प्रदक्षिणा करा. यावेळी ओम नम शिवाय या मंत्रांचा जप करा
या दिवशी पूजेच्या वेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी, दूध, हळद आणि तांदूळ अर्पण करा
शेवटी, हात जोडून कुटुंबाच्या सुख, समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना करा
या दिवशी पूजेनंतर पित्तरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण आणि दान करणे खूप शुभ मानले जाते.