स्पोर्टी डिझाइन, स्मार्ट फीचर्स; 457CC ती नवी बाईक झाली लाँच

Automobile

22 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Aprilia ट्युओनो ४५७

इटालियन दुचाकी कंपनी एप्रिलियाने भारतीय बाजारपेठेत आपल्या प्रसिद्ध ट्युओनो ४५७ बाईकची एक नवीन स्पेशल एडिशन लाँच केली आहे.

Picture Credit: Pinterest

आकर्षक डिझाईन

ही रचना २०२६ च्या प्रसिद्ध ट्युओनो १००० आर पासून प्रेरित आहे. ज्यामुळे याला एक खास रेट्रो आणि स्पोर्टी स्टाईल लाभली आहे.

Picture Credit: Pinterest

ही बाईक मांबा ब्लॅक आणि प्युमा ग्रे या दोन नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

दोन रंगांचे पर्याय

Picture Credit: Pinterest

नवीन ग्राफीक्समुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक चांगली दिसत आहे, यात एक नवीन स्मोक्ड फ्लायस्क्रीनसुद्धा देण्यात आली आहे. ज्यामुळे तिला स्पोर्टी लूक मिळतो.

नवीन ग्राफीक्स

Picture Credit: Pinterest

नवीन ट्युओनो ४५७ मध्ये पू्र्वीपेक्षा उंच हँडलबार आहे, ज्यामुळे चालकाला अधिक सरळ आणि आरामदायक रायडिंग पोझिशन मिळते.

उंच हँडलबार

\Picture Credit: Pinterest

यात एक ऍडजस्टेबल फ्रंट ब्रेक लिव्हर देखील आहे. जो रायडर आपल्या बोटांच्या लांबीनुसार सेट करु शकतो.

पुढचा ब्रेक

Picture Credit: Pinterest

कंपनीने बाईकच्या सस्पेंशन सेटअपमध्येही बदल केले आहेत. ज्यामुळे खराब रस्ते, खड्डे आणि स्पीड ब्रेकर्सवरुन जाताना अधिक आरामदायी अनुभव मिळतो.

बदल

Picture Credit: Pinterest

त्याच्या आसनांमध्ये उच्च लवचिकतेचा फोन वापरण्यात आला आहे. जो लांबट्या प्रवासात उत्तम आधार देतो.

फोम

Picture Credit: Pinterest

या बाईकमध्ये ४५७ सीसी पॅरलल ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. जे ४७.६ बीएचपी पॉवर आणि ४३.५ एनएम टॉर्क निर्माण करते.

इंजिन आणि पॉवर

Picture Credit: Pinterest

इंजिनला ६-स्पीड गिअरबॉक्स जोडलेला आहे. यात टीएफटी इन्स्टुमेंट कन्सोल, पूर्ण-एलईडी लायटिंग आणि इमोबिलायझर इग्निशन सिस्टीम मिळते.

टीएफटी इन्स्टुमेंट कन्सोल

Picture Credit: Pinterest

बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, टीपीएमएस, यूएसबी चार्जर, अँटी-थेफ्ट सिस्टीम, पॅसेंजर सीट कव्हर, फोर्क स्लायडर्स, हेल्मेट केबल लॉक यांसारख्या ऍक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत.

फीचर्स

Picture Credit: Pinterest

देशभरातली एप्रिलिया डीलरशिपवर बुकिंग सुरु झाले आहे. अधिकृत वेबसाईट आणि डीलरशिपद्वारे बुकिंग करता येईल.

बुकिंग सुरु

Picture Credit: Pinterest

बंपर डिमांड! ६ लाखांच्या SUV ने बाजारात उडवली धूम