यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि थोडे पाणी घालून बारीक वाटा.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण सुती कापडाच्या मदतीने किंवा गाळणीने गाळून घ्या.
Picture Credit: Pinterest
उरलेल्या चोथ्यात पुन्हा पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवा आणि दुसरे दूध काढून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता तयार दुधात पाण्यात भिजवून ठेवलेल्या कोकमाचं पाणी मिसळा.
Picture Credit: Pinterest
थोडं लसूण, जिरे आणि हिरवी मिरची एकत्र वाटून बारीक पेस्ट तयार करा आणि ती दुधात मिसळा.
Picture Credit: Pinterest
यात चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर घाला. साखर नाही घातली तरी चालेल.
Picture Credit: Pinterest
आता शेवटी यात कोथिंबीर घाला आणि काहीवेळ फ्रिजमध्ये ठेवून मग थंडगार सोलकढी पिण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest