चना डाळ स्वच्छ धुऊन २-३ तास भिजत ठेवा. नंतर कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा, पण पूर्ण गळू देऊ नका.
Picture Credit: Pinterest
कढईत थोडं तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट परतवा. त्यात कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
आता टोमॅटो, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि मीठ घालून चांगलं मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
शिजवलेली डाळ त्यात घालून थोडं पाणी टाका आणि ५-७ मिनिटं उकळू द्या. वरून कोथिंबीर घाला.
Picture Credit: Pinterest
पक्वानासाठी मैदा, रवा, जिरे, मीठ एकत्र करून कडक पीठ मळा.
Picture Credit: Pinterest
लहान गोळे करून पातळ पुरी लाटा आणि काट्याने टोचून घ्या. गरम तेलात कुरकुरीत तळा.
Picture Credit: Pinterest
गरमागरम पकोवान प्लेटमध्ये ठेवून त्यावर डाळ घाला. वरून कांदा, चटणी आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest