स्वीट कॉर्नचे दाणे 3–4 मिनिटे उकळत्या पाण्यात शिजवून घ्या. पाणी पूर्ण काढून दाणे स्वच्छ कापडावर पसरून कोरडे करा.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, मैदा, मीठ, लाल तिखट आणि काळी मिरी पावडर आणि कॉर्न घालून व्यवस्थित एकत्र करा.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर कॉर्न थोडेथोडे करून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. नंतर टिश्यू पेपरवर काढा.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या पॅनमध्ये बटर गरम करून त्यात लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून काही सेकंद परता.
Picture Credit: Pinterest
आता त्यात कांदा आणि ढोबळी मिरची घालून 1–2 मिनिटे हलके परता, जेणेकरून त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील.
Picture Credit: Pinterest
तळलेले कॉर्न, चाट मसाला, लाल तिखट आणि लिंबाचा रस घालून सर्व साहित्य चांगले हलवून एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
वरून ताजी कोथिंबीर भुरभुरवा आणि गरमागरम कुरकुरीत क्रिस्पी कॉर्न लगेच सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest