हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा केल्याने देव प्रसन्न होतात.
इष्टदेव आणि कुलदैवत यांची पूजा करताना फुलं अर्पण केली नाही तर पूजा अर्धवट राहते.
पूजा करताना देवदेवतांना फुलं वाहण्याचं शास्त्र काय आहे, जाणून घेऊयात.
असं म्हणतात की देवाला सोनं चांदी अशा मौल्यवान वस्तूंपेक्षा ही जास्त फुलं प्रिय आहेत.
धार्मिक शास्त्रानुसार फुलं ही गरिब आणि श्रीमंत अशा दोघांच्याही अंगणात फुलतात.
देवाला आपण खाली पडलेली नाही तर झाडावरची फुलं तोडून ती अर्पण करतो.
याला शास्त्रीय कारण देखील आहे. झाडाला आलेली फुलं ही तोडली नाही तर झाडाच्या इतर फाद्यांना पोषक तत्व मिळत नाही.
जसं झाडाच्या फांद्यांची छाटणी केल्यावर पुन्हा नवी पालवी बहरते अगदी तसंच फुलांचं आहे.
झाडाची फुलं तोडली की नव्या कळ्या येतात आणि झाडाची वाढ चांगल्या रितीने होते.
यामुळे देखील देवाला आपण पूजा करताना फुलं अपर्ण करतो.
यामुळे देखील देवाला आपण पूजा करताना फुलं अर्पण करतो.