हिवाळ्यात शरीराला ऊब देणारे पदार्थ आवर्जून खावेत

Life style

19 December, 2025

Author:  नुपूर भगत

हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी भाजीचा सूप खूप उपयुक्त ठरतो. यात पोषणमूल्ये भरपूर असतात आणि पचनही हलके राहते.

व्हेजिटेबल सूप

Picture Credit: Pinterest

कांदा, पालक किंवा मेथीची भजी थंडीत खास लागतात. चहा किंवा कॉफीसोबत भजी खाल्ल्याने थंडीची मजा वाढते.

गरमागरम भजी

Picture Credit: Pinterest

साधा पण आरोग्यदायी असा वरण-भात हिवाळ्यात उत्तम पर्याय आहे. वरून थोडं तूप घातल्यास शरीराला उष्णता मिळते.

वरण-भात तूप

Picture Credit: Pinterest

कडधान्यांपासून बनवलेली उसळ किंवा मिसळ प्रथिनांनी भरलेली असते. ही गरमागरम खाल्ल्यास पोट भरते आणि ऊर्जा मिळते.

उसळ किंवा मिसळ

Picture Credit: Pinterest

हिवाळ्यात बाजरी-ज्वारीची भाकरी खाल्ल्याने शरीर गरम राहते. ती पचायला सोपी असून दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवते.

बाजरी-ज्वारीची भाकरी

Picture Credit: Pinterest

डाळ-तांदळाची खिचडी ही थंडीच्या दिवसांत आरामदायी जेवण आहे. आजारपणातही खाण्यासाठी ती उत्तम मानली जाते.

खिचडी

Picture Credit: Pinterest

हिवाळ्यात गूळ आणि शेंगदाण्याचे पदार्थ शरीराला उष्णता देतात. लाडू चवीला चांगले आणि ताकद देणारे असतात.

शेंगदाण्याचे लाडू

Picture Credit: Pinterest