सध्या उष्णता अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ४५ अंशांच्या वर गेले आहे.
Img Source: Pinterest
तीव्र उष्णतेमुळे गाडीची केबिन जणू काही भट्टीसारखी वाटू लागते.
भट्टीसारख्या गरम होणाऱ्या केबिनमध्ये बसून काम करणे खूपच गैरसोयीचे होते. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
बाजारात अनेक परवडणाऱ्या अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या गाडीतील तापमान बऱ्याच अंशी कमी करु शकता.
विंडशील्डवर लावलेला सनशेड थेट सूर्यप्रकाश रोखतो. ज्यामुळे डॅशबोर्ड आणि सीट्स जास्त गरम होण्यापासून वाचतात. पार्किंग करताना नेहमी त्याचा वापर करा.
गाडीच्या बाजूच्या खिडक्यांसाठी पडदे हा देखील एक चांगला पर्याय आहे. ते सूर्यप्रकाश रोखतात आणि गाडीचे केबिन थंड ठेवण्यास मदत करतात.
बाजारात सहज उपलब्ध होणारे सीट कूलिंग कव्हर्स किंवा हवा खेळती ठेवणारे सीट कव्हर्स उष्णतेत मोठा दिलासा देतात.
डॅशबोर्ड हीट प्रोटेक्टर लावल्याने थेड सूर्यप्रकाश गाडीत शिरण्यास प्रतिबंध होतो, त्यामुळे आतील तापमान थोडे कमी राहते आणि प्लास्टिकच्या भागांचे संरक्षण होते.
तुमच्या गाडीचा एसी फारसा प्रभावी नसेल तर एक पोर्टेबल पंखा हा एक चांगला पर्याय ठरु शकतो.
हलक्या रंगाची विंडो फिल्म देखील उष्णतेची हानी लक्षणीयरित्या कमी करु शकते.
उन्हाळ्यात स्टिअरिंग व्हील खूप गरम होते. कव्हर वापरल्याने ते पकडायला सोपे जाते आणि चटके लागण्यापासून बचाव होतो.