Published Nov 08, 2024
By Shubhangi Mere
Pic Credit - Jio Cinema
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या बिग बॉस १८ चे स्पर्धक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करताना दिसत आहेत.
साऊथ इंडस्ट्रीमधील अभिनेत्री श्रुतिका अर्जुन प्रेक्षकांच्या मनात छाप पडताना दिसत आहे, बऱ्याचदा तिने तिचे विचार प्रेक्षकांसमोर मांडले आहेत.
रजत दलाल त्याच्या सडेतोड अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे, त्याचा बिग बॉसचा खेळ सुद्धा प्रेक्षकांना आवडत आहे.
कशिश कपूर नेहमीच तिच्या हटक्या अंदाजामुळे ओळखली जाते, मागील शोमध्ये सुद्धा ती चर्चेचा विषय होती.
.
टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध अभिनेता करणवीर मेहरा सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चर्चेचा विषय आहे, त्याने त्याच्या वन लायनरने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
.
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री इशा सिंहला शोमध्ये आल्यापासून प्रेक्षक प्रचंड ट्रोल करत आहेत. त्याचबरोबर तिने केलेल्या वक्तव्याला सुद्धा विरोध करत आहेत.
अभिनेता अविनाश मिश्रा आणि करणवीर मेहरा यांच्या वादाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन झाले आहे.
बिग बॉसच्या घरामधील महिला स्पर्धक चाहत पांडे सगळ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहे, त्यामुळे तिला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे.
टेलिव्हिजनवरचा सुपरस्टार विवियन डिसेनाने ८ वर्षानंतर बिग बॉस करण्याचे ठरवले आणि त्याला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.
मागील आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश करणारा पहिला वाईल्ड कार्ड दिग्विजय राठीची सोशल मीडियावर भरपूर फॅनफॉलोईंग आहे.
अभिनेत्री चुम दारंग ही तिचा घरामध्ये मतं कमी असली तर नुकताच पाचव्या आठवड्यामध्ये झालेल्या टास्कमध्ये तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.