Published Nov 02, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
घड्याळ डाव्या हातात घालण्यामागचे कारण
कित्येक वर्षांपासून डाव्या हातातच घड्याळ घातले जाते. मात्र डाव्या हातात घड्याळ घालण्यामागचे कारण काय आहे माहीत आहे का?
जास्त व्यक्ती या काम करण्यासाठी उजव्या हाताचाच वापर करतात, त्यामुळे काम करताना घड्याळाचा त्रास होऊ शकतो
डाव्या हातात घड्याळ बांधल्याने उजव्या हाताने काम करणे, लिहिणे, टाईप करणे इत्यादी काम करणे अधिक सोपे होते
.
चैन वा रिस्ट वॉच उजव्या हातात घालणे हेदेखील कठीण काम आहे, पण डाव्या हातात पटकन बांधली जाते, मात्र जे डावरे आहेत त्यांच्यासाठी हे उलट असू शकते
.
उजव्या हातात घड्याळ घातल्याने तुटण्याची शक्यता अधिक असते तसंच याला ओरखडाही येऊ शकतो
तुम्ही उजव्या हाताने सर्व काम करत असाल तर डाव्या हातात घड्याळ बांधणे अधिक सुरक्षित असते
पूर्वी घड्याळ हातात न घालता पट्ट्यासह खिशात ठेवली जात होती. पण तुटण्याची वा खराब होण्याची भीती अधिक होती
दक्षिण आफ्रिकेत जेव्हा शेतकऱ्यांचे युद्ध झाले तेव्हा घड्याळ तुटण्याची भितीने पट्टा बांधून त्यांनी डाव्या हाताला बांधण्याची सुरूवात केली