Published Dec 11, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
हिमवर्षाव पाहण्यास उत्सुक आहात तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिमवर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे.
मनाली तर उत्तमच पण हिमाचल प्रदेशच्या या काही भागांत मिळणारे अनुभव काही औरच आहेत.
कांगडा जिल्ह्यातील नड्डी येथे हिमवर्षावाचा अनुभव घ्या. निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरते.
सोलन जिल्ह्यातील चैल हील स्टेशन हिमवर्षावासाठी प्रसिद्ध आहे. शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते.
पांगी हे ठिकाण गेल्या काही दिवसांपासून हिमवर्षावामुळे चर्चेत आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी हे उत्तम स्थान आहे.
मंडी जिल्ह्यातील करसोग बर्फाच्छादित पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. येथे हिमालयाचे विहंगम दृश्य पाहता येते.
.
बरोटला मिनी काश्मीर म्हटले जाते. येथे हिमवर्षावासोबतच देवदाराच्या घनदाट जंगलांचा अनुभव घेता येतो.
.
शिमल्यातील कुफरी आणि नारकंडा ही ठिकाणे हिमवर्षावासाठी प्रसिद्ध आहेत. येथे बर्फात फिरण्याचा खास आनंद मिळतो.
.