www.navarashtra.com

By Mayur Navle 

गुंतवणूक करताना या गोष्टींकडे लक्ष द्याच

Pic Credit -   iStock

Published 21 Feb, 2025

आपल्याला भविष्यात आर्थिक स्थैर्य लाभावे म्हणूनच आपण गुंतवणूक करत असतो. पण गुंतवणूक करताना लक्ष दिले पाहिजे. 

चांगली गुंतवणूक

गुंतवणुकीपूर्वी त्यासोबत असलेला धोका नीट समजून घ्या. प्रत्येक गुंतवणुकीचे जोखमीचे प्रमाण वेगळे असते.

धोका समजून घ्या

आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट स्पष्ट असले पाहिजे – निवृत्ती नियोजन, घर खरेदी, मुलांचे शिक्षण किंवा संपत्ती निर्मिती.

लक्ष्य निश्चित करा

आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारच्या गुंतवणुकींचा समावेश करा. विविधता धोका कमी करते आणि दीर्घकालीन फायदा देते.

गुणवणुकीचे पर्याय

कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी ती संबंधित क्षेत्र, कंपनी, किंवा योजनांवर सखोल  संशोधन करा.

संशोधन करा

गुंतवणूक केल्यानंतर ती गुंतवणूक किती लवकर रोख स्वरूपात मिळवता येईल हे तपासा.

लिक्विडिटीचा विचार करा

बाजारातील चढ-उतारामुळे घाईघाईने किंवा भावनिक निर्णय घेणे टाळा.

भावनिक निर्णय टाळा

गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. ते गुंतवणुकीसाठी योग्य दिशा दाखवू शकतात.

तज्ञांचा सल्ला घ्या