भारतीय बाजारपेठेत दुचाकींना सर्वाधिक मागणी आहे. जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी दुचाकी ही गरज असते.
Picture Credit: Pinterest
हीरो मोटोकॉर्पने दशकांपासून या सेगमेंटवर वर्चस्व गाजवले आहे.
Picture Credit: Pinterest
हीरो मोटोकॉर्पनेही मे महिन्यात चांगली कामगिरी केली. देशांतर्गत आणि निर्यात विक्री मिळून एकूण ५७०,०६८ युनिट्सची विक्री केली.
Picture Credit: Pinterest
गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने एकूण ५०७,७०१ युनिट्सची विक्री केली होती. या आर्थिक वर्षात विक्रीने ११ लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला.
Picture Credit: Pinterest
कंपनीने मे महिन्यात देशांतर्गत बाजारात एकूण ५३६,७८४ वाहनांची विक्री केली आणि सुमारे ३३,२८४ वाहने परदेशात निर्यात केली.
Picture Credit: Pinterest
कंपनीने मे महिन्यात एकूण ५०३,७६३ मोटरसायकलची विक्री केली. जी गेल्या वर्षीच्या मे महिन्यात विकलेल्या ४७५१६४ युनिट्सच्या तुलनेत लक्षणीय वाढ आहे.
\Picture Credit: Pinterest
स्कूटरची विक्री दुप्पट झाली आहे. हीरो मोटोकॉर्पने या कालावधीत एकूण ६६,३०५ स्कूटर विकल्या, तर गेल्या वर्षी मे महिन्यात केवळ ३२,५३७ स्कूटर विकल्या गेल्या होत्या.
Picture Credit: Pinterest
कंपनीची निर्यातही जवळपास दुप्पट झाली असून, गेल्या वर्ष मे महिन्यात विक्री झालेल्या १८,७०४ युनिट्सच्या तुलनेत यंदा मे महिन्यात ३३,२८४ युनिट्सची विक्री झाली.
Picture Credit: Pinterest
हीरोच्या EV ब्रँडने वेग घेतला आहे. कंपनीने मे २०२६ मध्ये एकूण १९,०५२ इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली.
Picture Credit: Pinterest
हीरो मोटोकॉर्पच्या पोर्टफोलिओची सुरुवात हीरो एचएफ १०० पासून होते, ज्याची किंमत ४९,९५७ रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
हीरो स्प्लेंडर प्लस हे कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. हीरो मोटोकॉर्प दर महिन्याला या बाईक सिरीजच्या दोन लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करते.
Picture Credit: Pinterest