Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीजन, याच आंब्यापासून तुम्ही स्वादिष्ट मँगो शिरा तयार करू शकता
यासाठी एका कढईत तूप गरम करून त्यात रवा घाला आणि मंद आचेवर भाजून घ्या
दुसऱ्या पातेल्यात पाणी आणि दूध गरम करत ठेवा
भाजलेला रवा तयार झाला की त्यात हळूहळू उकळलेलं दूध-पाणी मिश्रण घालून सतत हलवत रहा, गुठळ्या होऊ देऊ नका
झाकण ठेवून २-३ मिनिटं मध्यम आचेवर शिजवा
रवा शिजल्यावर त्यात आंबा पल्प व साखर घाला. साखर विरघळेपर्यंत चांगले हलवत रहा
गॅस बंद करण्याआधी वेलदोडा पूड आणि काजू-बदाम घालून एकजीव करा
शिरा गरम गरम सर्व्ह करा. हवे असल्यास वरून आंब्याचे फोडी घाला