Published Dec 12, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
हरा कबाब चवीबरोबरच आरोग्यासाठीही पौष्टीक असतो, कारण यात पुष्कळ भाज्यांचा वापर केला जातो
पालक, मटार, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, ब्रेड क्रम्स, बेसन, हळद, गरम मसाला, कैरी पावडर, कोथिंबीर, तेल, मीठ इ.
यासाठी सर्वप्रथम पालक धुवुन, बारीक करुन उकळवून घ्या
एका पॅनमध्ये तेल, मटार, उकडलेली पालक आणि मीठ टाकून परतून घ्या
यानंतर यात उकडून मॅश केलेले बटाटे, कोथिंबीर आणि सर्व मसाले टाका आणि साहित्य नीट एकजीव करा
मग यात बेसन आणि ब्रेड क्रम्स टाकून सर्व साहित्य एकत्र करा
.
तयार मिश्रण एका प्लेटीत काढा आणि याचे कबाब तयार करा
.
तयार कबाब मध्यम आचेवर तळा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
.