Published Oct 05, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
या चटणीने करा युरिक अॅसिडचा खात्मा
सध्या युरिक अॅसिडची समस्या ही वाढताना दिसून येत आहे आणि यावर घरगुती चटणी ठरेल उपाय
तुमच्या शरीरात प्युरीन जमा होत असेल तर एक खास चटणी त्यावर उपाय आहे. तुम्ही या चटणीचे पाणीही पिऊ शकता
प्युरीन जमा होऊ लागल्याने शरीरातील युरिक अॅसिड वाढते आणि त्यामुळे किडनीवर पोटातील घाण साफ करण्याचे प्रेशर येते
.
शरीरात युरिक अॅसिड वाढले तर किडनी स्टोनसारख्या समस्या उद्भवतात आणि त्यामुळे शरीराला हानी पोहचते
.
एक चटपटीत चटणी अँटी प्युरीनप्रमाणे काम करते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढून हाडांना मजबूती देते
ही चटणी तुम्ही बनवून दिवसातून कधीही खाऊ शकता आणि हवं तर शिकंजीतून पिऊही शकता
1 कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, 1 इंच आल्याचा तुकडा, 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, लिंबाचा रस आणि काळे मीठ
हे सर्व साहित्य घ्या आणि पाण्यासह मिक्सरमधून वाटून तयार करा. तुमची चटपटीत चटणी तयार आहे. दिवसभरात कधीही खा
ही चटणी किडनी स्टोन बाहेर काढण्यासही उपयुक्त ठरते आणि शरीरातील विषारी पदार्थांचा नायनाट करते
सकाळी उपाशीपोटी तुम्ही जर पाण्यात ही चटणी मिक्स करून पित असाल तर संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही