ॲसिडिटीवर रामबाण ठरतील हे घरगुती उपाय

Life style

23 October, 2025

Author:  नुपूर भगत

थंड दुधातील कॅल्शियम पोटातील आम्लता कमी करते. एक ग्लास थंड दूध हळूहळू प्या. साखर न घालणे उत्तम.

थंड दुधाचे सेवन करा

Picture Credit: Pinterest

तुळशीचे काही पाने चावल्याने पोटातील आम्ल निर्मिती कमी होते. दिवसातून २-३ वेळा तुळशीची ४-५ पाने खा.

तुळशीची पाने चावा

Picture Credit: Pinterest

थोडं जीरं भाजून त्याची पूड करा आणि कोमट पाण्यासोबत घ्या. हे पचन सुधारून ॲसिडिटी कमी करते.

जीरं आणि पाणी

Picture Credit: Pinterest

जेवणानंतर एक चमचा सौंफ खाल्ल्याने पचन सुधारते आणि छातीत होणारी जळजळ कमी होते.

बडीशेप

Picture Credit: Pinterest

आवळा व्हिटॅमिन C ने समृद्ध असल्यामुळे तो पोटातील आम्लता नियंत्रित ठेवतो. सकाळी एक चमचा आवळ्याचा रस घ्या.

आवळ्याचा रस

Picture Credit: Pinterest

केळ्यामध्ये नैसर्गिक अँटॅसिड असते. दिवसातून एकदा केळी खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते.

केळी खा

Picture Credit: Pinterest

सकाळी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि थोडं लिंबूरस मिसळून घेतल्याने पचन सुधारते आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो.

मध-लिंबू पाणी 

Picture Credit: Pinterest