Published Feb 14, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
१४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस. शरीरातील लव्ह हार्मोन्स नक्की कधी बाहेर पडतात याविषयी आपण माहिती घेऊया
जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तेव्हा शरीरातील ऑक्सिटोसिन पातळी वाढते ज्यामुळे आपल्या मूडमध्ये सकारात्मक बदल होतो
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही जेव्हा जोडीदाराला मिठी मारता तेव्हा शरीरातून ऑक्सिटोसिन त्वरीत रिलीज होते ज्यामुळे ताण कमी होतो
आई आणि मुलाच्या दरम्यान घट्ट नातं बनण्यामध्येही ऑक्सिटोसिन महत्त्वाची भूमिका साकारते. बाळाच्या जन्माच्या वेळी आणि दूध पाजताना हे रिलीज होते
जोडीदारासह वेळ घालवताना, हातात हात घेतल्यावरदेखील ऑक्सिटोसिनची पातळी वाढते
ऑक्सिटोसिन केवळ प्रेमातच नाही तर मैत्रीच्या नात्यातील निखळ आनंदादरम्यानही रिलीज होतात. आतून आपल्याला चांगले वाटते
लव्ह हार्मोन केवळ शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक आरोग्यासाठीही महत्त्वाचे ठरते. ब्लड प्रेशर, हार्टसाठी उपयोगी ठरते
तणाव वा नैराश्य आले असेल तर एखाद्या जवळच्या माणसाला मिठी मारल्यास तुम्हाला आनंद मिळतो आणि ताण कमी होतो