वेळ कमी पण प्रेम जास्त? ट्राय करा या क्विक गिफ्ट आयडिया

Life style

14 february 2026

Author:  नुपूर भगत

सर्वात आधी तुमच्या पार्टनरला काय आवडतं याचा विचार करा. त्यांना चॉकलेट, पुस्तके, म्युझिक की काही खास वस्तू आवडतात का हे लक्षात घ्या.

आवडी-निवडी आठवा

Picture Credit: Pinterest

हाताने लिहिलेली छोटीशी प्रेमाची चिठ्ठी कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा जास्त खास असते. तुमच्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करा.

पर्सनलाइज्ड नोट लिहा

Picture Credit: Pinterest

मोबाईलमध्ये असलेले तुमचे सुंदर फोटो वापरून छोटा कोलाज किंवा व्हिडिओ तयार करा. त्यात तुमचं फेव्हरेट गाणं जोडा.

फोटो कोलाज

Picture Credit: Pinterest

घरीच छोटं गिफ्ट तयार करा. जसं की हाताने बनवलेलं कार्ड, त्यांच्या आवडीचा डिश किंवा छोटं सरप्राइज बॉक्स.

DIY गिफ्ट 

Picture Credit: Pinterest

घरीच कँडल लाईट डिनर प्लॅन करा किंवा जवळच्या कॅफेत छोटंसं सरप्राइज डेट ठरवा.

 अचानक डेट प्लॅन करा

Picture Credit: Pinterest

आजकाल अनेक ॲप्सवरून त्याच दिवशी गिफ्ट डिलिव्हरी मिळते. शेवटच्या क्षणीही सुंदर बुके किंवा गिफ्ट मागवू शकता.

ऑनलाइन क्विक डिलिव्हरी

Picture Credit: Pinterest

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा वेळ आणि लक्ष. मोबाईल दूर ठेवून त्या खास व्यक्तीसोबत मनमोकळा वेळ घालवा.

वेळ आणि लक्ष द्या

Picture Credit: Pinterest