www.navarashtra.com

Published Jan  26,  2025

By  Prajakta Pradhan

वसंत पंचमीला या शुभ योगांमध्ये करा पूजा, तुमचे भाग्य उजळेल

Pic Credit - iStock

सनातन धर्मात वसंत पंचमी हा सण अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. जाणून घ्या कोणत्या शुभ योगामध्ये या दिवशी पूजा करणे शुभ आहे?

वसंत पंचमी 2025

पंचांगानुसार, यंदा रविवार 2 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी साजरी केली जाईल. या दिवशी पूजा केल्याने ज्ञानप्राप्ती होते आणि जीवनात सुख-शांती राहते.

वसंत पंचमी कधी

माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीची सुरुवात 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.53 ला होईल आणि त्याची समाप्ती 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.36 वाजता होईल.

शुभ मुहूर्त

या दिवशी शनि देव सकाळी 8.51 मिनिटांनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रात संक्रमण होईल. या दिवसात शिवयोग, सिद्ध योग आणि सद्योग, रवियोग तयार होतात.

शुभ योग

वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. असे केल्याने साधकाला त्याच्या करिअरमध्ये यश मिळते आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित होते.

देवी सरस्वतीची पूजा

वसंत पंचमीला देवी सरस्वतीचे या देवी सर्वभूतेषू विद्यारुपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या मंत्रांचा जप करा.

मंत्रांचा जप करा

वसंत पंचमीला पूजा करताना देवी सरस्वतीला गोड पिवळा भात आणि मिठाई याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर हा प्रसाद लोकांना वाटा.

नैवेद्य

वसंत पंचमीच्या दिवशी वह्या, पेन यांसारख्या अभ्यासाशी संबंधित गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने अभ्यासाची आवड वाढते आणि बुद्धिमत्ता विकसित होते.

पुस्तक दान करा