'या' भाज्या कच्च्या खाणं ठरू शकतं धोकादायक

Life style

18 May 2026

Author:  प्रियंका मुंदिनकेरी

भाज्या

भाज्या खाणं आरोग्यदायी मानले जाते. यामध्ये शरीराला आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. 

Picture Credit: yandex

कच्च्या भाज्या 

कच्च्या भाज्या अनेकदा सॅलड आणि सँडविचमध्ये वापरतात. परंतु काही भाज्या अजिबात कच्च्या खाऊ नयेत.

Picture Credit: yandex

कोबी

कच्च्या कोबीमध्ये ई. कोलाय आणि साल्मोनेला हे जीवाणूही आढळतात. त्यामळे कच्ची कोबी खाऊ नये. 

Picture Credit: yandex

बीट जमिनीखाली वाढत असल्यामुळे, यामध्ये मेटल्स आणि कीटकनाशके असतात. म्हणून बीट हलके शिजवून खा.

बीट

Picture Credit: yandex

कच्चे मशरुम अनेकदा विषारी असू  शकतात. म्हणून मशरुम नेहमी शिजवून खा. 

मशरुम

Picture Credit: yandex

शिमला मिरची कच्ची वापरण्यााआधी  तिच्या वरच्या बिया काढून टाकाव्यात, कारण त्यात टेपवर्मची अंडी असू शकतात. 

शिमला मिरची

\Picture Credit: yandex

पालकमध्ये ऑक्झलेट्सचे प्रमाण जास्त असते, ऑक्झलेट्‌समुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो, त्यामुळे ती कच्ची खाणे टाळा. 

पालक

Picture Credit: yandex

मोड आलेले धान्यसुद्धा कच्चे खाऊ नये. मोड आलेले धान्य दमट आणि उबदार तापमानात वाढते, जिथे ई. कोलाय आणि साल्मोनेलासारखे जीवाणू वाढतात.

मोड आलेले कडधान्य

Picture Credit: yandex