Published Nov 11, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
तज्ज्ञांनी सांगितले मोड आलेले मूग खाण्याची वेळ
मुगामध्ये विटामिन बी१२, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन सी आणि प्रोटीन अशी अनेक पोषक तत्व आढळतात
मूग तुम्ही अंकुरित करून अर्थात मोड आणून खाल्ले तर याचे दुप्पट फायदे शरीराला मिळतात. मोड आलेले मूग सर्वात हेल्दी मानले जातात
जयपूरमधील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांनी सांगितले की मोड आलेले मूग खाण्याने शरीरात फायबर अधिक वाढते
.
पायल शर्मा, चीफ डाएटिशियन, धर्मशिला नारायण हॉस्पिटल, दिल्ली यांनी सांगितले की, मोड आलेले मूग सकाळच्या वेळी खाणं उत्तम आहे
.
सकाळी मोड आलेले मूग खाल्ल्याने मेटाबॉलिज्म जलद होते. तसंच यातील प्रोटीन शरीर योग्य पद्धतीने शोषून घेते
मोड आलेल्या मुगात प्रोटीनचा उत्तम सोर्स असून अन्न पचनासाठी फायदा मिळतो. तसंच सकाळी खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते
मुगासह तुम्ही टॉमेटो, लिंबू अथवा काही भाज्यांचा समावेश केल्यास शरीराला अधिक प्रोटीन आणि विटामिन सी मिळू शकते
मोड आलेले मूग उकडून खाल्ल्यास शरीराला विटामिन सी मिळते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते, तसंच कॅलरी कमी आणि जास्त फायबर मिळते
किडनीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी स्प्राऊट्स खाऊ नयेत यामुळे किडनीसंबंधित त्रास अधिक वाढू शकतात
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही