Written By: Mayur Navle
Source: Yandex
आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक जण धावताना किंवा चालताना दिसत असतात.
अशावेळी अनेक जण विचारतात की आरोग्यासाठी धावणे योग्य की चालणे? चला याबद्दल जाणून घेऊया.
चालणे किंवा धावणे हे शरीराच्या आरोग्य आणि वयाच्या गरजेनुसार ठरवले जाते.
ज्यांनी नुकताच वर्कआउट सुरू केला आहे त्यांच्यासाठी चालणे योग्य. तर फिट असणारी लोकं रनिंग करू शकतात.
धावण्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात, ज्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते.
एक्स्पर्ट म्हणतात जेष्ठ नागरिकांनी 1 किलोमीटर चालणे योग्य आहे.
जर तुम्ही नियमितपणे चालत असाल तर मग 2 km धावणे सुरू करा.