Published Nov 08, 2024
By Trupti Gaikwad
Pic Credit - Jio Cinema
कच्चे तांदूळ खाण्याची सवय, असू शकतो गंभीर आजार
माती खाणं किंवा कच्चे तांदूळ खाण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त लहान मुलांमध्ये आढळतं.
मात्र मोठ्या माणसांना देखील कच्चे तांदूळ खाण्याची सवय असते.
शरीरात आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असली की, माती आणि कच्चे तांदूळ खायची इच्छा होते.
.
लोह आणि झिंक योग्य प्रमाणात शरीराला मिळालं नाही की पिका सारखा आजार होण्याची शक्यता असते.
.
पिका डिसॉर्डर हा शरीरिक आणि मानसिक आजार आहे.
या मध्ये व्यक्तीला अनावश्यक म्हणजे पाटीवरची पेन्सिल, माती,खडू किंवा कच्चे तांदूळ खावेसे वाटतात.
त्यामुळे याचा शरीरावर आणि मनावर देखाील परिणाम होतो.
कच्चे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते तसंच व्यक्तीला सतत आळस येतो.
कच्चे तांदूळ जास्त खाल्याने रक्ताची कमतरता जाणवते.
त्यामुळे सतत आळस येणं किंवा झोप पूर्ण न होणं यासारख्या समस्या होतात.
जर अशाी लक्षण तुम्हालाही जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.