By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 22 Feb, 2025
नॉनव्हेजसोबत खाल्ले जाणारे कोंबडी वडे अनेकांच्या आवडीचे, याची रेसिपी फार सोपी आहे
500 ग्रॅम तांदूळ, 500 ग्रॅम ज्वारी, 250 ग्रॅम चणाडाळ, 125 ग्रॅम उडीद डाळ, 100 ग्रॅम गहू, एक कप जाड पोहे
25 ग्रॅम धणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे मेथी दाणे, 1 चमचे बडीशेप, तेल, मीठ
तेल आणि मीठ सोडल्यास बाकीचे सर्व साहित्य एक एक करून छान भाजून घ्या
भालजल्यानंतर साहित्य थंड करून दळून आणा
भाजणीचे पीठ तयार आहे, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही यापासून वडे तयार करू शकता
तयार पिठ एका वाडग्यात घ्या आणि यात मीठ, हळद, गरम तेल घालून पीठ मळा आणि काही तास झाकून ठेवा
मळताना पाण्याचा वापर कमी करा आणि पीठ जरा जाडसर मळा
तयार पिठाचे पुरीप्रमाणे वडे बनवा आणि कढईत तेल टाकून वडे कुरकुरीत वडे तळून घ्या