काही दिवस सोशल मीडिया बंद ठेवल्यास काय फायदे होतात?

Life style

13 May 2026

Author:  नुपूर भगत

सततच्या नोटिफिकेशन्स आणि माहितीच्या गर्दीपासून दूर राहिल्याने मनाला आराम मिळतो आणि मानसिक शांतता वाढते.

मन अधिक शांत राहते

Picture Credit: Pinterest

रात्री उशिरापर्यंत स्क्रीन वापरणं कमी झाल्याने झोप वेळेवर लागते आणि शरीराला पुरेशी विश्रांती मिळते.

झोपेची गुणवत्ता सुधारते

Picture Credit: Pinterest

सोशल मीडिया कमी वापरल्याने विचलित होणं कमी होतं आणि कामात किंवा अभ्यासात अधिक फोकस ठेवता येतो.

कामावर  लक्ष वाढते

Picture Credit: Pinterest

वारंवार फोन चेक करण्याची सवय कमी झाल्याने वेळेचा चांगला उपयोग करता येतो.

मोबाईलवरील अवलंबित्व कमी होते

Picture Credit: Pinterest

वाचन, व्यायाम, फिरणं किंवा नवीन छंद जोपासण्यासाठी जास्त वेळ मिळू लागतो.

स्वतःसाठी अधिक वेळ मिळतो

Picture Credit: Pinterest

इतरांच्या आयुष्याशी सतत तुलना करण्याची सवय कमी झाल्याने मन अधिक सकारात्मक राहू शकतं.

चिंता कमी होतात

Picture Credit: Pinterest

ऑनलाइन वेळ कमी केल्यावर प्रत्यक्ष भेटीगाठी आणि संवादासाठी अधिक वेळ देता येतो.

कुटुंबासोबतचा संवाद वाढतो

Picture Credit: Pinterest