ब्रम्हा विष्णू आणि महेश या तिघांचा अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त.
Photo Credit: Pinterest
हिंदू धर्मात दत्तसंप्रदायाला मोठं महत्व आहे.
याच दत्तगुरुंचे तीन मूळ अवतार कोणते ते जाणून घेऊयात.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात.
गुरुचरित्रात सांगतल्या प्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे निवासस्थान पिठापूर आहे.
दत्तगुरुंचे दुसरे अवतार म्हणजे नृसिंहसरस्वती स्वामी महाराज .
नृसिंहसरस्वती स्वामी महाराज हे 15 व्या शतकात प्रकट झाल्याचं म्हटलं जातं.
नृसिंहसरस्वती महाराजांचे नरसोबाची वाडी आणि गाणगापूर हे निवासस्थान मानलं जातं.
दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ हे 16 व्या शतकात प्रकट झाल्याचं म्हटलं जातं.
अक्कलकोट हे स्वामी महाराजांचं निवासस्थान असल्याचं गुरुचरित्रात म्हटलं आहे.