चहाप्रेमींप्रमाणेच कॉफीप्रेमींची देखील काही कमी नाही.
Photo Credit: Pinterest
कॉफीचं उत्पादन जगभरात मोठ्या प्रमाणात आहे.
यात कॉफीचे विविध प्रकार जाणून घेऊयात.
फिल्टर कॉफी एका भांड्यात भरपूर पाणी, थोडेसे दूध आणि कॉफी पावडर मिसळून फिल्टर कॉफी तयार केली जाते.
पितळेच्या भांड्यात ही कॉफी सर्व्ह करण्याची पद्धत दक्षिण भारतात आहे.
कॅपेचिनो कॉफीला भरपूर फेस असतो. य़ा कॉफीवर कोको पावडर टाकली जाते.
लाटे कॉफी मूळची इटालियन आहे. यात दूध जास्त असतं.
अमेरिकनो साधारण फिल्टर कॉफीसारखी दिसते.
यामध्ये फरक इतकाच आहे की, ते एस्प्रेसोच्या एक किंवा दोन भागात अधिक गरम पाणी मिसळून तयार केली जाते.
आयरिश कॉफीमध्ये व्हिस्की असते. यामध्ये कॉफीवर थंड फेस घातला जातो.