www.navarashtra.com

Published On 8 March 2025 By Mayur Navle 

रिकाम्या पोटी जिरं खाल्ल्याने काय होते?

Pic Credit -   iStock

जिरंमध्ये असलेल्या थायमॉल आणि फॉस्फोरसयुक्त घटकांमुळे अन्न पचन सुधारते आणि अपचनाची समस्या कमी होते.

पचनसंस्थेस मदत

जिरं नैसर्गिकरित्या अँटी-असिड गुणधर्म असलेले आहे, त्यामुळे अन्ननलिकेत होणारी जळजळ आणि ॲसिडिटी दूर करण्यास  मदत करते.

ॲसिडिटी नियंत्रणात ठेवते

रिकाम्या पोटी जिरं खाल्ल्यास Metabolism वेगाने काम करू लागतो, त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

वजन कमी होण्यास मदत

जिरं रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेहींसाठी ते उपयोगी ठरते.

डायबेटिससाठी फायदेशीर

जिरं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते.

त्वचेसाठी लाभदायक

जिरंमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होते.

रक्ताभिसरण सुधारते

जिरं अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मयुक्त असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्ग टाळण्यास मदत होते.

इम्युनिटी वाढवते

रिकाम्या पोटी जिरं खाल्ल्यास गॅसेस होण्याची समस्या आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.

पोटदुखी कमी होते