By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 29 Jan, 2025
पोटातून गाणं म्हणजे गाणं गाताना केवळ घशाचा नव्हे तर पोटाच्या मसल्सचा वापर करून गाणं गायचं.
पोटातून गाणं शिकण्यासाठी श्वासावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं असतं. खोल श्वास घेऊन हळूवार गाणं सुरू केलं जातं.
पोटातून गाणं करताना डायफ्रामचा (श्वास नियंत्रणासाठीचा स्नायू) योग्यरीत्या वापर केला जातो.
पोटातून गाणं केल्यामुळे आवाज अधिक स्पष्ट, स्थिर आणि दमदार होतो.
घशाऐवजी पोटाच्या स्नायूंवर ताण आल्याने गाणं गाताना घशाचा थकवा कमी होतो.
या प्रकारचे गायन शिकण्यासाठी योग्य गुरु किंवा संगीत शिक्षकाची मदत घेणे फायदेशीर ठरते.
पोटातून गाणं सहज जमत नाही; नियमित सराव करूनच त्यामध्ये प्राविण्य मिळवता येतं.
या तंत्रामुळे केवळ गाण्याचा दर्जा सुधारत नाही, तर फुफ्फुसांची ताकद वाढून शरीराला चांगला व्यायामही होतो.