Published Jan 23, 2025
By Shweta Chavan
Pic Credit - Pinterest
दरवर्षी सरकार संसदेत उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा मांडण्यासाठी अर्थसंकल्प सादर करते. आहे
अंतरिम अर्थसंकल्प सामान्यतः तेव्हा सादर केला जातो जेव्हा नियमित अर्थसंकल्पाची शक्यता कमी असते.
तत्कालीन सरकार वर्षभर सत्तेवर राहणार नसते. त्यांचा कार्यकाळ संपत आलेला असतो.
अंतरिम अर्थसंकल्प (interim budget) हे सर्वसाधारण अर्थसंकल्पासारखेच असते.
अंतरिम अर्थसंकल्पात सरकार आपला खर्च, महसूल, आर्थिक तूट आणि आगामी आर्थिक वर्षासाठी आर्थिक कामगिरीचा अंदाज सादर करते.
सरकार आपला कार्यकाळ संपेपर्यंतचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करते. देशाला पैश्याची कमतरता पडू नये हे यामागचे उद्दिष्ट असते.
लोकसभा निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरकार पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करते.
निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार सरकार अंतरिम बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या योजनेचा समावेश करू शकत नाही.