By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
Published 18 Feb, 2025
आज लाल किल्ला जरी लाल रंगाचा दिसत असला तरी त्याचा रंग लाल नव्हता.
चला तर मग जाणून घेऊयात लाल किल्ल्याच्या असली रंगाबद्दल.
आज लाल असलेला हा किल्ला कधीकाळी पांढराशुभ्र होता.
लाल किल्ल्याच्या निर्मितीमध्ये चुना तसेच संगमरवर दगडाचा वापर केला गेला आहे.
जेव्हा भारतात ब्रिटिश राजवट आली तेव्हा हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली गेला.
इंग्रजांच्या काळात या किल्ल्यात अनके बदल केले गेले.
या काळात किल्ल्यावरील चुना क्षतिग्रस्त होऊ लागला आणि पांढरेपणा निघू लागला.
इंग्रजांनी किल्ल्याची दुरुस्ती करताना किल्ल्याला लाल रंगाने रंगवले.