Published Oct 25, 2024
By Gorakshnath Thakare
Pic Credit - instagram
कृषीमंत्री धनंजय मुंडेंची संपत्ती कितीये?
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (ता.२४) साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आपला अर्ज भरताना त्यांनी कोणताही बडेजाव, थाट, शक्तीप्रदर्शन करणे टाळले आहे.
मुंडे यांच्याकडे २०१९ मध्ये २३ कोटींची संपत्ती होती. २०२४ ला त्यांनी निवडणूक आयोगाला ५३.८० कोटीची संपत्ती दाखवली आहे.
.
अर्थात सध्या त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीत मागील ५ वर्षात दुपटीने वाढ झाली आहे.
.
धनंजय मुंडे यांची संपत्ती मागील ५ वर्षात ३०.७५ कोटी रुपयांनी वाढली आहे.
धनंजय मुंडे यांच्या नावे १५.५५ कोटींची विविध ७ वाहने देखील आहेत.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे.