पाणी किती खोल आहे, याचा अंदाज घेतल्याशिवाय कार पुढे नेऊ नका.
Img Source: Pinterest
शक्य असल्यास दुसऱ्या वाहनाने सुरक्षितपणे मार्ग पार केला आहे का, ते पाहा.
कमी गतीने आणि स्थिर वेगात कार चालवा; अचानक वेग वाढवणे टाळा.
पाण्यातून जाताना गिअर वारंवार बदलू नका आणि इंजिनचा आरपीएम स्थिर ठेवा.
समोरच्या वाहनापासून पुरेसे अंतर ठेवा, जेणेकरून पाण्याच्या लाटा कमी तयार होतील.
पाण्यात ब्रेक अचानक दाबू नका; हळूहळू नियंत्रणात वाहन चालवा.
कार बंद पडल्यास पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण इंजिनचे नुकसान होऊ शकते.
पाणी पार केल्यानंतर हलक्या पायाने ब्रेक दाबून ते व्यवस्थित काम करत आहेत का, याची खात्री करा.
शक्य असल्यास पाणी साचलेले रस्ते टाळा आणि पर्यायी मार्गाचा वापर करा.