www.navarashtra.com

Published  Dec 01, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

मेथी दाणे किती प्रमाणात आणि कधी खावे, आरोग्यदायी फायदे

आयुर्वेदात मेथी दाण्याला हजारो वर्षांपासून औषधाप्रमाणे मानण्यात येते. मेथी दाणे कशा पद्धतीने वापरावे जाणून घ्या

मेथी दाणे

मेथी दाण्याचा स्वादाने पदार्थ चांगले होत असले तरीही मेथी दाणे प्रमाणात खाणे गरजेचे आहे. यासंबंधित पूर्ण माहिती घेऊया

प्रमाण

मेथी दाण्याने डायबिटीस कमी होतो. 1 चमचा मेथी दाण्यात 2.7 ग्रॅम फायबर, 6.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 2.5 ग्रॅम प्रोटीन, 0.7 ग्रॅम फॅट्स आहेत

पोषक तत्व

.

मेथीचे पाणी भूक शमवते आणि मेटाबॉलिज्म वाढवते आणि शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते आणि वजन नियंत्रणात राहते

मेटाबॉलिज्म

.

मेथी दाण्याचे सेवन करणे स्तनदा मातांसाठी उत्तम ठरते, यामुळे ब्रेस्ट मिल्क वाढते आणि ज्या महिलांना पाळीचा त्रास आहे त्यांनीही सेवन करावे

स्तनदा माता

स्टॅमिना, स्ट्रेंथ, लिबिडो वाढविण्यासाठी आणि टेस्टोस्टेरॉनसाठी मेथी दाणे उत्तम ठरतात. मुलांना सेक्सुअल विकनेस असेल तर नियमित खावे

टेस्टोस्टेरॉन

रोज 1 चमचा मेथी दाण्याचेच सेवन करावे. यापेक्षा अधिक दाणे खाणे तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाही

किती खावे

रात्री झोपण्यापूर्वी मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी उपाशीपोटी नाश्त्यापूर्वी याचे सेवन करावे

कधी खावे

जेवणापूर्वी काही वेळ आधी वा जेवल्यानंतर काही वेळानेच मेथी दाणे खावे. जेवणाच्या टप्प्यात याचे सेवन करू नये

काळजी

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप