Published Nov 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
सकाळी कच्ची लसूण खाण्याचे फायदे
भारतीय पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसणाचा रोज सकाळी कच्ची सेवन केल्याने शरीराला अधिक फायदा मिळतो
लसणामध्ये एलिसिन नावाचे मुख्य घटक असून अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट्स गुण आढळतात
याप्रमाणे लसणात विटामिन बी1, विटामिन बी 6, विटामिन सी सह मँगनीज, कॅल्शियम, कॉपर, सेलेनियम अधिक प्रमाणात असते
.
रोज लसूण खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात आणि रोज सकाळी उपाशीपोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत
.
आचार्य बाळकृष्ण यांच्या म्हणण्याप्रमाणे दिवसातून 3-5 कळ्या लसूण खावी. याचा वास सहन होत नसेल तर बारीक तुकडे करून पाण्यात भिजवून खावी
सांधेदुखी, हार्ट डिसीज वा कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्यास रात्री पाण्यात लसूण भिजवून ठेवावी आणि सकाळी उपाशीपोटी खावी
याशिवाय सर्दी खोकल्यासारख्या आजारावर आणि श्वासासंबंधित त्रासावर कच्ची लसूण खाणे फायदेशीर ठरते
आचार्य यांच्या म्हणण्याप्रमाणे लसूण सेवन केल्याने स्किन हेल्दी राहते आणि चेहऱ्यावर चमक कायम राहते, केसांसाठीही उत्तम ठरते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही