Published Nov 08, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
त्वचा आणि केसांसाठी कोणते ड्रायफ्रूट खावे?
ड्रायफ्रूटच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक लाभ मिळतात. तसंच केस आणि त्वचेसाठीही हे फायदेशीर ठरते
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन गरिमा गोएलकडून आपण कोणते ड्रायफ्रूट नियमित खावे जाणून घेऊया
खजूर खाण्यामुळे त्वचा आणि केस हेल्दी राहण्यास मदत मिळते. यात लोह, विटामिन सी आणि डी भरपूर प्रमाणात असून ब्लड सर्क्युलेशन वाढवते
.
काजूमध्ये विटामिन ई, जिंक, सेलेनियम, अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स असून चांगल्या त्वचा आणि केसांसाठी रोज 3-4 काजू खावे
.
निरोगी त्वचा आणि केसांसाठी तुम्ही नियमित प्लम खाऊ शकता. प्लममध्ये अँटीऑक्सिडंट्स असून याचा शरीरालाही लाभ मिळतो
सुकवलेल्या अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, कॉपर, लोह, विटामिन, अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असून त्वचेवरील डाग काढून टाकते
काळ्या मनुकांमध्ये कॅल्शियम, फायबर, विटामीन बी सह लोहदेखील आढळते. यामुळे केस आणि त्वचा दोन्ही चांगली राखली जाते
अॅप्रिकॉट त्वचेच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरते, तसंच केस हेल्दी ठेवते. अँटीऑक्सिडंट गुण, टॅनिंग, सुरकुत्या, कोंडा आणि केसगळतीवर उत्तम ठरते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही