Published Jan 17, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
केंद्र सरकारने शासकीय अधिकारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाची मंजुरी दिली आहे
नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये ७ वा वेतन आयोग लागू केला होता. यापूर्वी ४,५ आणि ६ व्या वेतन आयोगाचा काळ १० वर्षांचा होता
८ वा वेतन आयोग लागू झाल्यावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढेल. फिटमेंट फॅक्टर २.८६ फिक्स करता येऊ शकतो. कमीत कमी बेसिक पगार ५१,४८० असेल
या फॅक्टरसह पगार फिक्स केल्यास कमीत कमी पगार हा २६ हजार रुपये असू शकतो. याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो
७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ पट ठेवण्यात आला होता आणि बेसिक पगार १८ हजार होता
या फॅक्टरनुसार वेतन आणि पेन्शन वाढविण्यात येऊ शकते. वेगवेगळ्या पातळीनुसार पगार वाढू शकतो, मात्र यात भत्ता समाविष्ट नाही
पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, ऑटोनॉमस बॉडी कर्मचारी आणि ग्रामीण डाक सेवक, तसंच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कर्मचारी यांना लाभ नाही
१ जानेवारी, २०२६ पासून ८ वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे