www.navarashtra.com

By Divesh Chavan

कोकणात पाणवठ्याच्या ठिकाणी निवास करणारे सात आसरा कोण? जाणून घ्या

Pic Credit -   Pinterest

Published 24 Feb, 2025

या देवतांना लोकसाहित्यात सृजनाची अधिष्ठात्री देवता म्हणून ओळखले जाते.

सप्तमातृका

स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक म्हणून योनीची पूजा पावित्र्याने केली जाते आणि तिचा संबंध सप्तमातृकांशी जोडला जातो.

योनीपूजेचा संदर्भ

असे मानले जाते की, जर तरुण मुली किंवा बाळंतीण स्त्रिया पाण्यात मृत्यू पावल्या तर त्यांचे आत्मे सात आसरा स्वरूपात भूतलावर वावरतात.

पाण्यात आत्महत्या 

यांचे वास्तव्य विहिरी, तळी आणि जलाशयांमध्ये असते, त्यामुळे काही ठिकाणी त्यांना जलदेवता मानले जाते.

जलदेवता म्हणून ओळख

अमावास्या किंवा पौर्णिमेला कोणी पाण्यात बुडाल्यास, त्याला आसरांनी ओढून नेल्याचा समज आहे.

अंधश्रद्धा?

या अप्सरा सातच्या संख्येने वावरतात आणि त्यांची वस्ती जलाशयांप्रमाणे तीन रस्त्यांच्या संगमावरही असल्याचे मानले जाते.

सातच्या संख्येने असणाऱ्या अप्सरा

दक्षिण भारतात काही ठिकाणी त्यांना ग्रामदेवता मानले जाते, आणि सात शेंदूरचर्चित दगडांची पूजा केली जाते.

ग्रामदेवता

मानवी आयुष्यात कोणतेही कार्य सुरू करताना या देवतांचे स्मरण करण्याची परंपरा लोकसंस्कृतीत दिसून येते. 

लोकसंस्कृती