By Mayur Navle
Pic Credit - iStock
Published 18 Feb, 2025
भविष्यात आर्थिक स्थिरता मिळावी म्हणून अनेक जण विविध गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असतात.
त्यातही भारतीय सोन्यात जास्त गुंतवणूक करतात. पण ही गुंतवणूक करण्यामागचे कारण काय?चला याबद्दल जाणून घेऊया.
सोन्याला भारतीय संस्कृतीत शुभ मानले जाते. सण, समारंभ, आणि धार्मिक विधीमध्ये सोन्याचा वापर महत्त्वाचा असतो.
सोन्याला आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे अनेक कुटुंबे दीर्घकालीन संपत्ती म्हणून यामध्ये गुंतवणूक करतात.
सोन्याचे मूल्य इतर मालमत्तांप्रमाणे जास्त प्रमाणात कमी होत नाही, त्यामुळे आर्थिक अस्थिरतेच्या काळात ते सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.
दागिने, नाणी, बार, सोन्याची ईटीएफ्स (Exchange Traded Funds) यासारख्या विविध स्वरूपांत सोन्यात गुंतवणूक करता येते.
जागतिक आर्थिक संकटे किंवा चलनातील अस्थिरतेच्या वेळी सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
सोन्याला विक्री सहज उपलब्ध असते. त्यामुळे तातडीच्या गरजेच्या वेळी सोने विकून आपण पैसे घेऊ शकतो