दुर्लक्ष केल्यास वाढू शकते समस्या

Automobile

15, June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पावसाळ्यात बाहेरचे तापमान कमी आणि हेडलाइटच्या आतले तापमान जास्त असते. या फरकामुळे हेडलाइटमध्ये कंडेन्सेशन होऊन पाण्याचे थेंब तयार होतात.

हेडलाइटमध्ये कंडेन्सेशन

Img Source: Pinterest 

बहुतेक कार हेडलाइट्समध्ये हवा खेळती राहण्यासाठी लहान व्हेंट्स असतात. त्यामुळे थोडासा ओलावा आत जाणे ही सामान्य बाब असू शकते.

पूर्णपणे सीलबंद नसतात

हेडलाइटभोवतीची रबर सील खराब किंवा सैल झाल्यास जास्त प्रमाणात ओलावा आत जाऊ शकतो आणि पाण्याचे थेंब जमा होऊ लागतात.

रबर सील खराब झाल्यास

कार वॉशनंतरही समस्या

हाय-प्रेशर वॉश दरम्यान पाणी हेडलाइटच्या आत शिरू शकते. यामुळे काही वेळा धुके किंवा थेंब दिसू शकतात.

किती प्रमाणात सामान्य?

हेडलाइटवर थोडे धुके दिसून काही मिनिटांत नाहीसे होत असेल, तर ते सामान्य मानले जाते. मात्र पाण्याचे मोठे थेंब किंवा पाणी साचणे हे समस्येचे लक्षण असू शकते.

याचे नुकसान काय?

सतत ओलावा राहिल्यास LED, बल्ब, रिफ्लेक्टर आणि वायरिंगचे नुकसान होऊ शकते. यामुळे हेडलाइटची प्रकाशक्षमता कमी होऊ शकते.

काय करावे?

हेडलाइटची सील, व्हेंट्स आणि फिटिंग तपासून घ्या. पाणी वारंवार साचत असल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणी करून घेणे योग्य ठरते.