आपण झोपेत असताना अनेक वेगवेगळी स्वप्नं पाहतो. कधी आनंदी, कधी भीतीदायक, पण स्वप्नं पडतात तरी का?
Picture Credit: Pinterest
आपण झोपलेलो असतानाही मेंदू पूर्णपणे बंद होत नाही. REM Sleep दरम्यान मेंदू सर्वाधिक सक्रिय असतो आणि याच वेळी स्वप्नं पडतात.
Picture Credit: Pinterest
दिवसभरात जे अनुभव, भावना आणि विचार आपण मनात साठवतो, ते झोपेत मेंदू पुन्हा प्रोसेस करतो आणि त्यातून स्वप्नं तयार होतात.
Picture Credit: Pinterest
जास्त तणाव, भीती किंवा चिंता असेल तर भयानक किंवा अस्वस्थ करणारी स्वप्नं पडण्याची शक्यता जास्त असते.
Picture Credit: Pinterest
मनात दडलेल्या इच्छा, न सांगितलेल्या भावना स्वप्नांच्या रूपात समोर येतात, असे मानसशास्त्र सांगते.
Picture Credit: Pinterest
स्वप्नं मेंदूला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला मदत करतात. यामुळे शिकण्याची आणि आठवण ठेवण्याची क्षमता वाढते.
Picture Credit: Pinterest
आपल्याला स्वप्नं आठवत नाहीत याचा अर्थ ती पडली नाहीत असे नाही. प्रत्येक माणसाला रोज स्वप्नं पडतात, फक्त काहींना ती लक्षात राहतात.
Picture Credit: Pinterest