By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
Published 19 Feb, 2025
नातेवाईक किंवा जवळच्या कोणाचं लग्न असलं की आहेर केला जातो.
याच आहेराची प्रथा कशी सुरु झाली हे जाणून घेऊयात.
लग्नात आहेर का दिला जातो, याबाबत किस्सोंकी दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.
लग्नात भेटवस्तू किंवा पैसे आहेर म्हणून दिले जातात.
पुर्वी लग्नासाठी लांबचा प्रवास करुन माणसं यायची.
दळणवळणाची साधनं फार नसल्याने भेटीगाठी कमी व्हायच्या.
याचकारणाने लग्नासारख्या मोठ्य़ा कार्यक्रमाला पाहुण्यांची आवर्जुन उपस्थिती असायची.
लग्नाच्या निमित्ताने होणारी भेट अविस्मरणीय असावी आणि नवविवाहीत जोडप्य़ाला आठवण रहावी म्हणून आहेर देण्याची प्रथा सुरु झाली.