लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा असं म्हटलं जातं.
Photo Credit: Pinterest
सगळ्यात मोठा आनंद काय तर लहान मुलांसारख राहता येणं असं सगळेच म्हणतात.
घरात जर छोटं बाळ असेल तर सगळेच त्याचे लाड करतात.
छोटी बाळं झोपेत अनेकदा झोपेत हसतात तेव्हा खूप गोड दिसतात.
धार्मिकदृष्ट्या पाहायला गेलं तर असं म्हणतात की, सटवाई बाळाला स्वप्नात येऊन हसवते.
वैज्ञानिकदृष्ट्या बाळ स्वप्नात का हसतं ते जाणून घेऊयात.
एका विशिष्ट मस्तिष्किय क्रियेमुळे बाळ हसतं असं तज्ज्ञ सांगतात.
बाळाचा मेंदू हळूहळू विकसित होत असतो.
मोठ्या माणसांप्रमाणेच दिवसभरात जे जे घडतं बाळाला ही ते स्वप्नात दिसतं.
याच कारणामुळे बाळ झोपेत हसत असावं असं तज्ज्ञ सांगतात.