Published On 9 March 2025 By Harshada Jadhav
Pic Credit - Pinterest
उन्हाळा सुरु झाला आहे. हा उन्हाळा जूनपर्यंत सुरु राहणार आहे.
उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात राहिल्याने उष्माघात आणि चक्कर येणे यासारखे आजार होऊ शकतात.
जेव्हा आपण तेजस्वी सूर्यप्रकाशातून सावलीत येतो तेव्हा आपल्याला सर्वकाही अंधारमय वाटू लागते.
असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
जेव्हा तुम्ही कडक सूर्यप्रकाशातून तुमच्या खोलीत येता तेव्हा तुम्हाला काही काळासाठी अंधार दिसू लागतो.
जेव्हा तुम्ही कडक सूर्यप्रकाशात असता तेव्हा आपले डोळे लहान होतात.
सूर्यप्रकाशातून जेव्हा तुम्ही अंधाऱ्या खोलीत किंवा सावली असलेल्या ठिकाणी जाता तेव्हा लहान डोळ्यांमुळे अंधार दिसतो.
पण काही क्षणातच तुमचे डोळे सामान्य होतात आणि तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दिसू लागतं.
तुम्ही प्रकाशातून सावलीत याल आणि तुम्हाला अंधार दिसेल तेव्हा घाबरून जाण्याची गरज नाही.
कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि यामुळे डोळ्यांना कोणतीही समस्या येत नाही.