Published Oct 18 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
या लोकांनी जिरे का खाऊ नये जाणून घ्या
जिरे हा एक मसाला आहे जो अनेक प्रकारच्या पाककृतींमध्ये चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरला जातो.
साधारणपणे जिऱ्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. पण काही लोकांनी यापासून अंतर ठेवावे
काही लोकांना जिऱ्याची ॲलर्जी होऊ शकते. ज्यामुळे त्वचा किंवा इतर ॲलर्जीच्या समस्या उद्भवू शकतात.
.
गर्भधारणेमध्ये जिऱ्याचे अधिक सेवन करु नये कारण की ते गर्भपाताचे कारण ठरु शकते.
.
जिऱ्यामध्ये अँटी-कॉगुलंट गुणधर्म असतात. जे लोक रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत त्यांनी जिरे खाणे टाळावे.
जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर जिऱ्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करा. जास्त जिरे खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
जिरे रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.