Published Nov 28, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
महिलांनी नारळ फोडणे अशुभ का मानले जाते?
हिंदू धर्मात नारळाचा उपयोग पूजा आणि धार्मिक विधींमध्ये केला जातो, ते अतिशय पवित्र मानला जातो.
नारळात त्रिवेदाचा वास असल्याचे मानले जाते. नारळाचे तीन वरचे भाग भगवान शंकराच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत.
इतकंच नाही तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडू केली जाते, पण तुम्हाला माहिती आहे का महिलांनी नारळ का फोडू नये
.
धार्मिक मान्यतेनुसार, नारळ देखील एक बीज मानले जाते तर बियाणे लहान मुलासारखे मानले जाते.
.
अशा परिस्थितीत, आई आपल्या मुलावर खूप प्रेम करते आणि त्याला कोणत्याही प्रकारे दुखवू शकत नाही.
अशा परिस्थितीत महिलांनी नारळ फोडणे म्हणजे त्यांच्या मुलांचे नुकसान करण्यासारखे मानले जाते.
यामुळेच स्त्रियांना नारळ फोडण्यास मनाई आहे कारण असे मानले जाते की त्याचे नकारात्मक परिणाम होतात.
मात्र, पुरुषांनी नारळ फोडल्याने वडिलांचे मुलांवर प्रेम नसल्याचे दिसून येते का, असाही तर्क आहे.
धर्मग्रंथांमध्ये या सर्व युक्तिवादांसाठी कोणतेही ठोस पुरावे नसले तरी, हे एक लोकप्रिय समज म्हणून समजले जाऊ शकते.