Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
अनेकांना जेवण केल्यानंतर अथवा जेवताना पाणी पिण्याची सवय असते
मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमची ही सवय तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम करत असते
जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनासाठी आवश्यक असलेले जठराग्नी (पचनाग्नि) कमी होतो, त्यामुळे अन्न नीट पचत नाही.
अन्न पचवण्यासाठी जाठरातील आम्ल (गॅस्ट्रिक अॅसिड) गरजेचे असते, पाणी त्याचा प्रभाव कमी करतं.
अन्न पूर्ण न पचल्यामुळे पोट फुगणे, गॅस, अपचन यासारख्या समस्या निर्माण होतात.
पाणी अन्नासोबत घेतल्यास पोषकतत्त्वांचे शोषण (अॅब्झॉर्प्शन) योग्य पद्धतीने होत नाही.
पचन बिघडल्यामुळे शरीरातील चरबी साठू लागते आणि वजन वाढण्याची शक्यता अधिक होते.
पाचनप्रक्रियेत अडथळा आल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहणे कठीण होते – विशेषतः मधुमेहींसाठी.
नीट न पचलेलं अन्न शरीरात आलस्य निर्माण करतं, त्यामुळे जेवल्यानंतर थकवा वाटतो.
जेवण झाल्यानंतर किमान 30 ते 45 मिनिटांनंतर पाणी प्यावं.