Published Nov 08, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
हा आहे जगातील सर्वात महाग शेअर, चर्चा रंगतेय 3 लाखाच्या शेअरची
शेअर बाजारात सध्या अशा शेअरची चर्चा होतेय, ज्याने MRF च्या शेअर किमतीलाही मागे सोडले आहे
हा शेअर भारतातील सर्वात महाग शेअर ठरत असून याची किंमत 3 लाख इतकी वाढली आहे आणि रोज अपर सर्किट होतोय
पण तुम्हाला माहीत आहे का? जगातील सर्वात महाग शेअर नक्की कोणता आहे आणि त्याची किंमत किती आहे
.
जगातील 6व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे कंपनीचा बर्कशायर हॅथवे हा सर्वात महागडा शेअर मानला जातो
.
या शेअरबाबत सांगायचे झाले तर 4,59,800 डॉलर अर्थात भारतीय चलनानुसार 3.88 करोड इतकी त्याची किंमत आहे
बर्कशायर हॅथवे शेअरची किंमत ही भारतातील सर्वात महागड्या शेअरच्या तुलनेत 120 पट जास्त आहे
सध्या भारतातील सर्वात महाग शेअर Elcid Investment आहे, ज्याची किंमत 3,16,597 इतकी आहे
हा शेअर काही दिवसांपूर्वी केवळ 3 रूपये किंमतीचा होता, मात्र रातोरात स्पेशल ऑक्शन आल्यानंतर 2 लाख रूपयांवर पोहचला
कोणत्याही शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आधी वित्तीय सल्लागाराची मदत घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही