Published Nov 01, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
गरोदरपणात करण्यात येणारी योगासने
गरोदरपणात महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्या असतात. स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी योगासन करावे असे तज्ज्ञांनी सांगितले
योगगुरू दीपक कुमार नुसार, प्रेग्नेन्सीदरम्यान योग करणे उत्तम ठरते. यामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत होते
गरोदरपणात 12 ते 14 आठवड्यापासून महिला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग वा व्यायाम सुरू करू शकतात
.
पाठ आणि कंबरदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी गोमुखासन गरोदरपणात करावे. यामुळे हाडंही मजबूत राहतात
.
गरोदरपणात अधोमुख श्वानासन केल्याने पचनाशी संबंधित समस्या आणि पाठीच्या वरील दुखणे कमी होते. रिलॅक्स होण्यासाठी योग करा
चौथ्या महिन्यापासून महिलांना कंबरदुखी सुरू होते. यादरम्यान मूड स्विंग्ज, कंबरदुखी आणि रिलॅक्सेशनसाठी शवासन करावे
सुरूवातीपासूनच योग वा व्यायाम करू नका. कपालभाती करणे टाळा. मार्गदर्शकाशिवाय योग करणे चुकीचे ठरेल
आपल्या मार्गदर्शकाच्या देखरेखीखालीच गरोदरपणादरम्यान योग करावा